Surah An-Nasr With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 110. अन् नसर् - ٱلنَّصْر

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. जेव्हा अल्लाहची मदत आली आणि विजय प्राप्त झाला
  2. आणि (हे पैगंबर स.) तुम्ही पाहिले की लोक झुंडी झुंडीने अल्लाहच्या धर्मात प्रवेश करीत आहेत
  3. तेव्हा आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच त्याचे पावित्र्य गान करा, आणि त्याच्याकडे क्षमेची प्रार्थना करा. निःसंदेह तो मोठा पश्चात्ताप स्वीकारणारा आहे.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post